IPL 2021 : PAK मुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीगचा (IPL- 2021) प्रारंभ ९ एप्रिलपासून होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सलामीची लढत होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणखी एक विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले असताना त्यांना टेंशन देणारी माहिती गुरुवारी पुढं आली आहे. तर पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वन-डे आणि ट्वेंटी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा गुरूवारी करण्यात आल्याने आता रोहित शर्माच्या टीमचं टेंशन वाढलं असताना पाहायला मिळत आहे.

सलग तीनवेळा IPL जेतेपद मिळवण्यासाठी संधी –
IPLच्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. तर आतापर्यंत एकाही टीमला हा पराक्रम करता आलेला नाही. मुंबई इंडियन्सने २०१९ आणि २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यावर विजय मिळवून IPL जेतेपदं म्हणून नाव मिळवलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा विजय मिळवला आहे.

नेमकं काय घडलं ?
आफ्रिकेनं ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या टीमने क्विंटन डी कॉक, डेव्हिड मीलर, लुंगी एनगिडी, ॲनरीच नॉर्ट्झे, कागिसो रबाडा यांचा त्यात समावेश केला आहे. २, ४ आणि ७ एप्रिल रोजी वन-डे सामने होणार आहेत आणि त्यानंतर चार सामन्यांची १०, १२, १४ आणि १६ एप्रिल रोजी ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. डी कॉकचा वन डे टीममध्ये समावेश केल्यानं तो ७ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय कर्तव्यावर आहे आणि त्यानंतर IPL साठी भारतात येईल. परंतु, कोरोनामुळे त्याला कमीतकमी ७ दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्याच काही सामन्यांना तो मुकेल असे हे प्रकरण आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा बॅकअप सलामीवीर ख्रिस लीन मुंबईत दाखल झाला आहे. डी कॉकच्या अनुपस्थितीत तो रोहित शर्मासोबत सुरुवातीच्या काही सामन्यांना सलामीला उतरणार आहे. फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस यांचा वन-डे किंवा ट्वेंटी-20 टीममध्ये समावेश न केल्यानं ते IPL च्या पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असणार आहेत.