भाजपच्या वाटेवरील विखे-पाटलांचं काँग्रेसला ‘हे’ खुलं आव्हान ; म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या विजयानंतर राजकारणात अनेक घडामोडी पहायला मिळत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात काँग्रेसमध्ये आतल्या-आत मतभेद दिसून आले. तेव्हा सर्वाधिक चर्चेचा ठरलेला विषय़ म्हणजे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश. तसंच काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची सुरु असलेली घुसमट सर्वश्रुत झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये राहुल आपल्या मुलाला निवडणूक प्रचारासाठी पाठींबा दिला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या वागण्यावरून त्यांचा फक्त भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याचा राहिला होता. तोही लवकरच होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील पक्ष सोडणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १२ जागांवर युतीला विजय मिळवून देऊ, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला आहे. तसंच यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी तोफ डागली आहे. निळवंडे कालवे प्रश्नावर संगमनेर-अकोल्यातील प्रस्थापित प्रश्नावर पंचवीस वर्षांपासून केवळ राजकारण करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत त्याप्रमाणे काम करा, असा सल्लाही विखेंनी यावेळी थोरातांना दिला आहे.

राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात कोणते खातं मिळणार यावर राजकिय वर्तुळात चर्चा आहे. त्यांना त्यांच्या आवडीचे खातं कृषी खाते की गृहनिर्माण खातं देणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सावध भूमिका घेत याचे उत्तर मुख्यमंत्र्यांवर ढकलून दिले आहे. मंत्रिपदाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल. लोकसभा निवडणुकीत घुसमट झाली असली तरी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा युतीने जिंकल्याचे समाधान आहे. तसंच आता विधानसभा निवडणुकीतही याच यशाची पुनरावृत्ती करू, असं सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.