‘स्टार खेळाडू’ राफेल नदालनं 13 वर्षीय मुलीला केलं ‘KISS’, नंतर मागितली ‘माफी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड नंबर 1 टेनिस स्टार राफेल नदालनं या वर्षीच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. नदालला आता तिसऱ्या फेरीत पाल्बो कारेनाचा सामना करावा लागणार आहे. पुरुष एकेरी वर्गातील दुसऱ्या फेरीत नदालनं अर्जेंटीनाच्या डेलबोनिसचा 6-3, 7-6, 6-1 असा पराभव केला आहे.

दुसऱ्या फेरीतील सामन्या दरम्यान एक असा प्रकार घडला आहे ज्यामुळे नदाल चर्चेत आला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या सेटमध्ये नदालकडे 4-1 अशी आघाडी होती. यावेळीच जो काही प्रसंग घडला त्याचा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

नेमकं काय झालं ?

नदाल खेळत असताना एक रिटर्न कोर्टाच्या बाहेर गेला आणि त्यावेळी बॉल गर्लच्या मानेला चेंडू लागला. त्यानंतर 19 वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेल्या नदालनं त्या बॉल गर्लच्या गालावर किस करत माफी मागितली. नदालनं या सामन्यानंतर बॉल गर्ल एनेटा आण तिच्या परिवाराची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी नदालनं एनेटाची माफी मागत तिला आपली हँडबॅग गिफ्ट केली.

नदालनं एकदा म्हणजेच 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला आहे. नदालनं एनेटासोबतचा एक फोटोही सोशलवर शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं की, “मला आनंद झाला की, ती ठिक आहे. एनेटा एक धीट मुलगी आहे.”

 

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like