Raghunath Kuchik Rape Case | ‘चित्रा वाघ यांनीच मला गोव्यात डांबून ठेवलं’; रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने केला खळबळजनक खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिन्यात एका तरूणीने शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल (Raghunath Kuchik Rape Case) केला होता. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. गुन्हा दाखल झाल्यावर पीडित तरूणी गायब असल्याच दावा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला होता. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्या तरूणीने कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप (Raghunath Kuchik Rape Case) केले होते त्या पीडितेने आता चित्रा वाघ यांच्यावरच खळबळजनक आरोप केले आहेत.

 

चित्रा वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करायला सांगितले होते. माझ्या मोबाईलमधून एका ॲपच्या मदतीने मेसेज पाठवण्यात आले. त्यासोबतच चित्रा वाघ यांनी मला गोव्यात (Goa) डांबून ठेवलं असल्याचा गौप्यस्फोट संबंधित पीडितेने केला आहे. यावर चित्रा वाघ काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तरूणी गायब असल्याचा चित्रा वाघ यांचा दावा –
रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलगी दोन दिवसांपासून गायब होती. ही गायब मुलगी गोवा राज्यातील मडगावच्या (Madgaon) कोलवा गावामध्ये सापडली आहे.
काल रात्री तिचा फोन मला आला होता. तिला इंजेक्शन देऊन काही व्यक्तींनी नेलं होतं.
या व्यक्तींमध्ये पोलिसही होते. या पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तिच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या देखील घेण्यात आल्याची माहिती तीने स्वत: मला दिली आहे. (Raghunath Kuchik Rape Case)

 

दरम्यान, चित्रा वाघ यांनी दावा केल्यामुळे प्रकरण चिघळलं होतं. मात्र पीडितेने आता चित्रा वाघ यांनी दबाव टाकला असल्याचं म्हटल्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

 

Web Title :- Raghunath Kuchik Rape Case | It was Chitra Wagh who kept me in Goa The victim in the Raghunath Kuchik case made a sensational revelation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा