ललीत मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी…सर्व चोरांची नाव ‘मोदी’च का ?

रांची : वृत्तसंस्थासर्व चोरांची नावं मोदीच का असतात ? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तेथील सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ललीत मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी,… मला एक गोष्ट सांगा. सर्व चोरांची नावं मोदीच का असतात?’, असा प्रश्न राहुल गांधींनी केला. तसंच यावेळी त्यांनी राफेल कराराच्या मुद्द्यावरूनही मोदींवर टीका केली.


भारतीय हवाई दल देशाचं रक्षण करतं. देशाच्या संरक्षणासाठी हवाई दलाचे वैमानिक बलिदान देतात. मात्र आमचे पंतप्रधान हवाई दलाचा पैसा अनिल अंबानींच्या खिशात घालतात, अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी मोदींवर केली. ललीत मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नावं घेत सर्व चोरांची नावं मोदीच का असतात, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, सभेला जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी तेथील आदिवासींची भेट घेतली. राहुल गांधींनी फक्त भेट घेतली नाही तर त्यांच्यासोबत नृत्यही केलं. तसंच सभे पूर्वी काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यात्रा काढली होती.

Loading...
You might also like