Rahul Narvekar-Thackeray Group MLA | ‘घटनेतील तरतुदींनुसार…’, आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचे विधान; ठाकरे गटाचा आरोप म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Narvekar-Thackeray Group MLA | शिंदे गटातील 40 आणि ठाकरे गटातील 14 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वत: ही सुनावणी घेणार आहेत. प्रत्येक आमदारांचं मत जाणून घेतल्यानंतर राहुल नार्वेकर अपात्रतेबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहेत. (Rahul Narvekar-Thackeray Group MLA)

सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. येत्या 14 सप्टेंबर रोजी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांची सुनावणी होणार आहे. यासाठी सर्व आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. (Rahul Narvekar-Thackeray Group MLA)

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले, गुरुवारी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीच्या नोटीशींना आम्ही लेखी उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरवला होता. तरीही, आम्हाला त्रास दिला जात असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला आहे.

वैभव नाईक पुढे म्हणाले, पहिल्यांदा 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी होती.
ती न करता बाकींच्या आमदारांना त्रास देण्यासाठी नोटीसा पाठवून हजर राहण्यास सांगितले आहे. पण, हजर राहत आमचं मत मांडू.

दरम्यान 14 तारखेला होणाऱ्या सुनावणीवर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,
घटनेतील तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. सर्व आमदारांना मतं मांडण्याची संधी दिली जाईल.
सुनावणी झाल्यानंतर निर्णय घेऊ, असे नार्वेकर यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”

Girish Mahajan | भाजप नेते गिरीश महाजनांचे मराठा आरक्षणाबाबत मोठं सुचक वक्तव्य; म्हणाले, “असे आऱक्षण…”