Rahul Narvekar Won Maharashtra Vidhan Sabha Speaker Election | ‘शिंदे’शाहीची सुरूवात थाटात ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांचा विजय; जाणून घ्या मतं किती पडली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Narvekar Won Maharashtra Vidhan Sabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Speaker Election) आज भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत एकूण 164 मते मिळाली. तसेच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Government) उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना 107 मते मिळाली. या मतदानात रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. (Rahul Narvekar Won Maharashtra Vidhan Sabha Speaker Election)

 

या मतदान प्रक्रियेत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर शीरगणतीद्वारे विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू झाली. पण 14 क्रमांकाच्या मतापर्यंत मतमोजणी जाताच गोंधळ उडाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत काही सूचना केल्या.

 

शीरगणीतीद्वारे सत्ताधारी आमदार 1, 2, 3 याप्रमाणे मत देत होते. पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिले आणि त्यानुसार शिरगणतीला सुरु केली.

नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राजकीय कारकीर्द

भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून नार्वेकर आमदार आहेत.

आधी शिवसेनेत होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

राष्ट्रवादीने नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभव झाला.

नार्वेकर यांची जून 2016 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते.
भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसर्‍यांदा नगरसेवक आहेत.
वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.

 

Web Title :- Rahul Narvekar Won Maharashtra Vidhan Sabha Speaker Election | maharashtra vidhan sabha speaker election 2022 bjp candidate rahul narvekar vs shivsena rajan salvi final result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचे वक्तव्य, बँकांना दिले हे महत्वाचे निर्देश