Raigad Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या; रायगडमधील घटना

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – Raigad Crime News | रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एका 27 वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सासू सासरे व पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. (Raigad Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
रुकसान फरहान येलुकर असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणीचे नाव आहे. रुकसानने 2 मार्च रोजी बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महाड तालुक्यातील इसाने कांबळे या ठिकाणी आत्महत्या केली आहे. मृत रुकसानाचे लग्न 2019 मध्ये झाले होते. रुकसानाला मूलबाळ होत नसल्यामुळे आणि तिच्या हाताला चार बोटे नाहीत, असे बोलून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तसेच तिला मारहाण आणि शिवीगाळदेखील केली जात असे. (Raigad Crime News)

या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्ताक येलुकर, फैरोजा मुस्ताक येलुकर, फरहान मुस्ताक येलुकर या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीला म्हणजेच या विवाहितेच्या सासर्‍याला अटक करण्यात आली आहे तर सासूचा शोध सुरु आहे. तसेच मृत महिलेचा पती हा नोकरी निमित्त मागच्या वर्षापासून दुबई कुवेत इथे आहे. मृत महिलेच्या सासूला लवकरच अटक करण्यात येईल असे महाड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. संबंधित आरोपी विरोधात भादवि कलम 306, 498(अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करत आहेत.

 

Web Title :- Raigad Crime News | a married woman end life in mahad

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट