MSRTC Bus News | एसटी रेल्वेच्या मदतीला ! रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

मुंबई : MSRTC Bus News | दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती ,तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती .अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमानांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले.

तसेच त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रा पर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. (MSRTC Bus News)

Pune Crime News | गुंतवणूकदारांची 300 कोटींची फसवणूक ! पुण्यातील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट कंपनीतील तिघांना अटक; मुख्य सुत्रधार फरार

ACB Trap News | अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 2 कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Pune Disaster Management | आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना सरपंच अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Prabhas Project K Look Out | प्रोजेक्ट- केमधील अभिनेता प्रभासचा पहिला लूक आऊट; सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया

Deepika Padukone | हॉलीवुडच्या संपावर बॉलीवुडवर देखील परिणाम; दीपिकाचे असे आहे कनेक्शन

The Poona Merchants Chambers | राज्यभरातील व्यापारी पुण्यात एकवटणार; पुण्यात होणार राज्य व्यापार परिषद