Railway Gate On Pune-Pandharpur Route | पुणे-पंढरपूर मार्गावरील रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

पोलीसनामा ऑनलाइन – Railway Gate On Pune-Pandharpur Route | येत्या शनिवारी व रविवारी पुण्याहून पंढरपूरला येण्याचा किंवा पंढरपूरवरून पुण्यामध्ये किंवा आळंदीमध्ये जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. येणाऱ्या शनिवारी (दि.16) व रविवारी (दि.17) रोजी पुण्याहून जेजुरी – फलटण मार्गे पंढरपूर प्रवास करणाऱ्यांना 40 किलोमीटर जास्त प्रवास करावा लागणार आहे. कारण पुणे पंढरपूर मार्गावरील जेजुरी- निरा दरम्यान असणारे थोपटेवाडी येथील पुणे- मिरज रेल्वे मार्गावर वरचे 27 नंबरचे गेट हे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही शनिवार आणि रविवार दोन दिवस पूर्णपण बंद असणार आहे. (Railway Gate On Pune-Pandharpur Route)

शक्यतो येत्या शनिवारी किंवा रविवारी पुणे ते पंढरपूर हा प्रवास टाळावा. पण प्रवास करणे गरजेचेच असेल तर लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रेल्वे मार्गाच्या कामासाठी येत्या शनिवारी व रविवारी हे रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आले आहेत. मात्र या मार्गामुळे तब्बल 40 किलोमीटरचा अधिकचा प्रवास नागरिकांना करावा लागणार आहे. (Railway Gate On Pune-Pandharpur Route)

जर पुण्याहून पंढरपूरला जायचे असेल तर पुणे- शिरवळ- लोणंद मार्गे पंढरपूरला जाता येऊ शकेल. किंवा सोलापूर हायवे मार्गे पंढरपूरला जाता येईल. या पर्यायी मार्गाचा वापर पंढरपूरकडे जाणाऱ्या लोकांनी करावा अस आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून वाल्हे आणि नीरा ग्रामपंचायत कार्यालयाला यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. मात्र नागरिकांकडून याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील अनेक लोक हे
गणपतीसाठी गावी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. तसेच जवळपासच्या गावातील लोक देखील खरेदीसाठी
पुणे शहरामध्ये येत असतात. गणेशोत्सवाच्यापूर्वीचा हा शेवटचा शनिवार-रविवार असल्याने अनेकांनी प्लॅन केले होते.
मात्र मुंबई पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांना या पालखी महामार्गावरील रेल्वेगेट बंद असल्यामुळे
आता जेजुरीतून मोरगाव आणि पुन्हा नीरा येथे येऊन पुढील प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी 40 किलोमीटर उगाच वळसा घालून जावे लागणार

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना