रेल्वे E-Tickets काळाबाजाराचा ‘सुत्रधार’ दुबईत, प्रशासनाला Email पाठवून दिली धमकी, मागणी मान्य करा अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयआरसीटीसीच्या रेल्वे आरक्षण सॉफ्टवेअरमधील त्रुटीचा गैरफायदा घेऊन बनावट रेल्वे तिकीटे बुक करण्याचा टोळीचा छडा पोलिसांनी लावला आहे. या काळाबाजारातून मिळालेला पैसा पाकिस्तान, बांगलादेश आणि दुबईत असलेल्या संबंधितांमार्फत दहशतवाद्यांना पुरविला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीकडे अत्याधुनिक सॉफ्टवेअर असून त्याद्वारे ते अगदी सहजपणे रेल्वेची तिकीटे बुक करत आहेत. या टोळीच्या सुत्रधाराने दुबईहून रेल्वेला ई मेल पाठविला असून त्यात त्याने मागणी केली आहे की, मला महिना २ लाख रुपये पाठविले तर आपण हे काम बंद करु. व रेल्वेच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीची माहिती देऊ असे कळविले आहे.

या टोळीचा मुख्य सुत्रधार हमीद अशरफ असून तो दुबईत आहे. त्याला या रॅकेटकडून दरमहा १० ते १५ कोटी रुपये मिळत असल्याचा संशय आहे. अशरफ हाही सॉफ्टवेर डेव्हलपर आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील एका शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर २०१९ मध्ये अशरफ हा दुबईला पळून गेला. क्राऊड होस्ट केलेल्या सर्व्हरची देखभाल करण्यासाठी अशरफकडे तांत्रिक टीम आहे. त्याच्याकडे १० ते २० मोठे तिकीट विक्रेते आहेत. जे सर्व पैसे सांभाळतात आणि अशरफ याला विविध हवाला खाती आणि क्रिप्टो चालनातून दुबईला पाठवितात.

अशरफ याच्याकडील बनावट बेकायदेशीर सॉफ्टवेअर रेल्वे तिकीट बुकींगसाठी वापरणारे तब्बल २० हजार एजंट आहेत. त्यांच्याकडून दरमहा १० ते १५ कोटी रुपये अशरफकडे पोहचविले जातात, असा संशय रेल्वे पोलिसांना आहे. अशरफ याच्याकडील बेकायदेशीर सॉफ्टवेअरला प्रतिबंध करण्यात रेल्वेला आजपर्यंत यश आलेले नाही. आयआरसीटीसीकडील सॉफ्टवेअरपेक्षा अधिक जलद आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर अशरफकडे आहे. त्याच्या जोरावर तो एजंटमार्फत हा बेकायदेशीर तिकीट बुकींग राजरोजपणे सुरु ठेवू शकला आहे.

रेल्वेमध्ये अवैध तिकीट काढण्याच्या सर्वात मोठ्या टोळीतील एक सदस्य गुलाम मुस्तफा याला पोलिसांनी भुवनेश्वर येथून १० दिवसांपूर्वी अटक केली. त्याच्याकडे आयबी, स्पेशल ब्युरो, ईडी, एनआयए, कर्नाटक पोलीस चौकशी करत असून त्यातून एक एक धक्कादायक बाबी समोर येत आहे.

मुस्तफा याच्याकडे एक प्रोग्रामरची टीम आहे. त्याच्याकडे ३ हजार ५६३ वैयक्तिक आयआरसीटीसी युजर आयडी आहेत. तसेच २ हजार ४०० एसबीआय शाखा आणि ६०० ग्रामीण बँकेतील शाखांची माहिती असून तेथे त्याची खाती आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –