‘रेल्वे’चा तिकिटावरील प्रवाशांना मिळणारी सब्सिडी ‘बंद’ करण्याचा विचार, ‘हा’ होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे प्रवाशांना मिळणाऱ्या सब्सिडी सोडण्याचा आग्रह करण्याची योजना लागू करण्याचा विचार रेल्वे करत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेने उत्पन्न वाढवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला 100 दिवसांची योजना सोपावली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की भारतीय रेल्वे एका प्रवाशांमागे एका तिकिटावर फक्त 53 टक्के खर्च वसूल करते, बाकी 47 टक्के प्रवाशांना सब्सिडी देण्यात येते. ही सब्सिडी रेल्वेच्या उत्पन्नावर अतिरिक्त बोझा पडत आहे.

तिकिटाचे दोन पर्याय –
अधिकाऱ्याने सांगितले की लोकांना रेल्वे तिकिटावरील सब्सिडी सोडण्याचा आग्रह करण्याचा प्रकार असा आहे की लोकांना पेट्रोलियम गॅसवर मिळाणारी सब्सिडी सोडायला लावण्यासारखे आहे. प्रवाशांना रेल्वे तिकिट घेण्यासाठी दोन पर्याय उपल्बध करुन देण्याचा विचार आहे. ते म्हणजे सब्सिडीविना तिकिट आणि सबसिडी सहित तिकिट. जे सब्सिडी सोडतील त्यांनी तिकिटांचा जास्त दर द्यावा लागेल.

अधिकाऱ्याने सांगितले की, सेंटर फॉर रेल्वे इंफार्मेशन सिस्टम (क्रिस) भारतीय रेल्वे केटरिंग आणि टूरिज्म कॉर्पोरेशन वेबसाईटमध्ये विना सब्सिडी तिकिट खरेदी करण्याचा पर्याय देण्यासाठी आवश्यक ते बदल करेल. रेल्वेने तिकिट विक्रीतून जवळपास 50,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आधिकाऱ्याने सांगितले की, 2019-20 मध्ये 56000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष रेल्वेने निर्धारित केले आहे. सब्सिडी सोडण्याच्या योजनेतून हे लक्ष पुर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची