नगर शहराला वादळी पावसाचा तडाखा ; विद्युत खांब आडवे, घरावरचे पत्रे उडाले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहरात आज दुपारपासून जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे वादळात उडून गेले मुख्यालयातील मोटार वाहन विभागातीलही पत्रे उडून गेले.

दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात शहरातील विविध भागांतील झाडे उन्मळून पडली, विद्युत खांब आडवे पडले. तसेच काही ठिकाणचे पत्रे उडून गेले. त्यात पोलिसांच्या मोटार वाहन विभागांसह अनेक घरांचा समावेश आहे. वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस हा सुरूच आहे.

दुपारी अचानक सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पावसाचा वेग तीव्र असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. तसेच नाले तुडुंब वाहत होते. दिल्लीगेटसह अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज