Raj Kundra Arrested | CM ठाकरेंचं ‘ऑपरेशन क्लीन’ आहे तरी काय? राज कुंद्राला अटक म्हणजे बॉलिवूडला पहिला दणका?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा उद्योगपती पती राज कुंद्रा याला सोमवारी (दि.19) रात्री अटक (Raj Kundra Arrested) केली. राज कुंद्राला (Raj Kundra Arrested) याला अश्लिल चित्रपट निर्मिती आणि त्याचे काही अ‍ॅप्सवरुन प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक केली. त्यानंतर त्याल कोर्टात हजर केले असता 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रासारख्या मोठ्या हस्तकाला अटक (Arrest) करणं हे मुंबई फिल्म इंडस्ट्रीत सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्लीन’चा पहिला टप्पा आहे.

CM ठाकरेंकडून पोलीस आयुक्तांना आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे बॉलिवूडमध्ये असलेली घाण साफ करण्याबाबत गंभीर आहेत. बॉलिवूडमधील घाण साफ करण्यासाठी आयपीएस (IPS) अधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. बॉलिवूडमध्ये संघटित माफिया काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आहे.

कडक पावलं उचलण्याचे आदेश

बॉलिवूडमधील संघटीत माफियांची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) अवैध व्यवसाय आणि अन्य कलाकारांवर सिनेमात काम मिळवण्यापासून रोखलं जातं. धमकी देऊन त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते. यासंदर्भात कडक पावलं उचलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कुंद्राचे इक्बाल मिर्चीसोबत संबंध

अटक करण्यात आलेला राज कुंद्राचे आयपीएल (IPL) सट्टेबाज इक्बाल मिर्चीसोबत संबध होते. तसेच अनेक कलाकारांना त्याच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा एका अ‍ॅपमुळे चर्चेत आला होता. मालाडमध्ये पोलिसांनी छापेमारी केली तरी बॉलिफेम (Bollyfame) नावानं नवीन ओटीटी (OTT) लॉन्च केला होता. या ओटीटीवर कन्टेंट सेक्युअर थीम्स सांगितलं जात होतं. याच प्लॅटफॉर्मवर गायिका पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छलने एक वेबसिरीज केली होती. यामध्ये एका ऑटोमध्ये लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रवाशांच्या हालाचाली कैद केल्या होत्या. या वेब सिरीजनंतर मुंबई पोलिसांत तक्रार दाखल झाली होती.

Raj Kundra Arrested | raj kundra arrest cm uddhav thackerays operation clean commissioner hemant nagrale mission

आता इंडस्ट्रीमधील साफसफाईची वेळ आली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. माहितीनुसार मुंबई पोलीस आयुक्त पदाची सुत्र हाती घेताना हेमंत नगराळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते, की आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये साफसफाई करण्याची वेळ आली आहे. तेव्हापासून वेब सिरीज, टीव्ही सिरीजशिवाय ओशिवारा, गोरेगाव, मालाड, मड आयलँड, मालवणीसारख्या परिसरात होणाऱ्या शुटींगबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले.

पोलिसांकडून ‘या’ लोकांचा शोध सुरु

मुंबई पोलिसांसोबत राज्यातील इतर शहर आणि जिल्हा पोलिसांना निर्देश दिले आहेत. कोणत्याही कलाकारावर आणि तंत्रज्ञानावर दबाव आणण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तर त्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करावी. मुंबई पोलीस सध्या अशा लोकांचा शोध घेत आहेत, ते बाहेरुन आलेल्या कलाकारांना धमकावून त्यांचे शोषण करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने लहान शहरातून आलेल्या मुलींचा समावेश आहे.

मॉडेलचा राज कुंद्रावर आरोप

गहना वशिष्ठ (Gehna Vashisht), पुनम पांडे (Poonam Pandey) , शर्लिन चोपडा
(Sherlyn Chopra) आणि सागरिका सोनम (Sagarika Sonam) या मॉडेलने राज कुंद्रावर
गंभीर आरोप केले आहेत. हे कलाकारांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या सह्या घेतात.
त्यानंतर मर्जीप्रमाणे काम बदललं जातं. न्यूड ऑडिशनबाबत मागणी करणं हा देखील या गोरखधंद्याचा एक भाग आहे. राज कुंद्रावर आरोप करणारे आता पुढे येत आहेत. मात्र यामुळे बॉलिवूडमधील मोठ्या गटाला कारवाईचा धक्का बसला आहे.

महिला युट्यूबरचा मोठा दावा

काही लोकांकडून राज कुंद्राला दोषी ठरवले जात आहे. तर काहींनी हे षडयंत्राचा भाग असल्याचे
म्हटले आहे. आता एका लोकप्रिय महिला युट्यूबर राज कुंद्राच्या विरोधात मैदानात उतली आहे.
राजने आपल्याला अश्लील व्हिडिओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा युट्यूबर
पुनीत कौरने (Puneet Kaur) केला आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Modi Government | खुशखबर ! आता आई-वडील आणि ज्येष्ठांच्या देखरेखीसाठी मिळतील 10 हजार रुपये, मोदी सरकार बदलतंय ‘हा’ नियम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Raj Kundra Arrested | raj kundra arrest cm uddhav thackerays operation clean commissioner hemant nagrale mission

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update