Raj Kundra Porn Film Case | पोलिसांनी छापा टाकून ‘सर्च’ सुरू केल्यानंतर ‘ढसा-ढसा’ रडत होती शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासोबत सुद्धा झाला होता वाद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोर्न फिल्मच्या काळ्या उद्योगात अडकल्याच्या आरोपात अटक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) च्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नुकताच राजचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळण्यात आला आहे आणि त्यांना आता 27 जुलैपर्यंत कोठडीतच राहावे लागेल. या दरम्यान आज राज आणि शिल्पासंबंधीत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की 23 जुलैला शिल्पा शेट्टीच्या घरी झालेल्या पोलीस रेडदरम्यान (Raj Kundra Porn Film Case) काही असे घडले आहे ज्याची कल्पना कुणीही केली नव्हती.

मीडिया रिपोर्टनुसार, पोर्न फिल्म प्रकरणात पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन तिची सुद्धा चौकशी केली होती. यावेळी प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रा सुद्धा सोबत होता. सांगितले जात आहे की या दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीमध्ये जोरदार वादावादी झाली. मीडिया रिपोर्टनुसार आपला जबाब नोंदवताना शिल्पा शेट्टी पोलिसांसमोर ‘ढसा-ढसा’ आणि जोरजोरात रडत होती. यानंतर शिल्पाने आपला पती राज कुंद्रा निर्दोष असल्याचे सुद्धा म्हटले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मीडिया रिपोर्टनुसार, चौकशीदरम्यान शिल्पाने जवळपास रडत म्हटले की,
त्यांना वादग्रस्त अ‍ॅप हॉटशॉटवर कोणता कंटेंट दाखवला जात होता याबाबत ठोस माहिती नव्हती.
शिल्पाने हे सुद्धा म्हटले आहे की, इरॉटिका, पोर्नपेक्षा खुप वेगळे असते.
इतकेच नव्हे, शिल्पाने हा सुद्धा दावा केला आहे की पती राज कुंद्रा पोर्न फिल्मच्या उद्योगात नाही.

राज कुंद्रासह 11 लोकांना 19 जुलैला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पोर्न फिल्मच्या उद्योगात असल्याच्या आरोपात अटक केली होती.
राज कुंद्राने पोर्न फिल्मच्या उद्योगात मोठी रक्कम लावली होती आणि तो यातून मोठा नफा सुद्धा कमावत होता.
पोलिसांनी हे सर्व पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे.

Web Title :- Raj Kundra Porn Film Case | raj kundra case shilpa shetty had an argument with husband broke down during the raid reports

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,843 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

EPFO | घरबसल्या नोंदवा EPF आणि EPS अकाऊंटसाठी वारसदाराचं नाव, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपुर्ण प्रोसेस