Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ ! ED ही खोलणार ‘पॉर्न’राज, हॉटशॉटसाठी ‘अ‍ॅपल’कडून मिळाली एवढी रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बहुचर्चित अश्लील चित्रपट रॅकेटच्या (Pornography) तपासात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि परदेशात रक्कम वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सक्तवसुली संचालनालयही (ED) तपासासाठी सक्रिय झाली आहे. त्यामुळे आता क्राइम ब्रँच (Crime Branch) बरोबर आता ईडीचाही ससेमिरा राज कुंद्राच्या (Raj Kundra Porn Film Case) पाठीमागे लागणार आहे. दरम्यान, हॉटशॉटसाठी अ‍ॅपलकडून 1 कोटी 13 लाख 64 हजार मिळाले असून ते राज कुंद्राच्या (Raj Kundra Porn Film Case) कोटक महिंद्रा बँकेत जमा झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता ईडीने या आर्थिक व्यवहारांचा छडा लावण्याचे ठरवले आहे. ईडीने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे प्राथमिक अहवाल मागविला असल्याने येत्या काही दिवसांमध्ये तपास सुरू होणार आहे.

शिल्पा शेट्टीची होणार चौकशी
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा प्रकरणाचा एफआयआर (FIR) आणि प्राथमिक तपासाचा अहवाल मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मागवण्यात आली आहे. मनी लॉड्रिंगअंर्तगत गुन्हा नोंदविण्यात येणार असून फेमाअंतर्गत (Foreign Exchange Management Act) राज कुंद्राला नोटीस समन्स बजावले जाणार आहे. त्याचबरोबर कंपनीच्या संचालकांची देखील चौकशी होऊ शकते. या प्रकरणावर शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) भूमिका पाहिल्यास तिचीही चौकशी केली जाणार आहे.

मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पला (Ryan Thorpe) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे. यावेळी पोलिसांनी कुंद्राच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात 51 अश्लील व्हिडिओ जप्त केल्याचा दावा केला आहे.

 

हॉटशॉटसाठी अ‍ॅपलकडून 1 कोटी 13 लाख रुपये

तपासामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका हॉटशॉटसाठी (Hotshot) अ‍ॅपलकडून (Apple) 1 कोटी 13 लाख 64 हजार 886 रुपये राज कुंद्राला मिळाले आहेत. हे पैसे कुंद्राच्या कोटक महिंद्रा बँकेत जमा झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कुंद्राच्या सिटी बँक (Citi bank) आणि कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) खाते गोठविण्यात आले आहे. त्याचबरोबर आता कुंद्राच्या गुगलवरील व्यवहाराची माहिती घेण्यात येत आहे.

तपासासाठी फॉरेन्सिक ऑडिटर
पोलिसांनी कुंद्राच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले असून फॉरेन्सिक ऑडिटरसमोर (Forensic audit) आरोपीची चौकशी करायची असे न्यायालयाला सांगत पोलिसांनी कुंद्राला आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली.
यावेळी पोलिसांनी कुंद्राने डिलिट केलेला तपशीलही मिळविण्यात येत असल्याचे नमूद केले.
मात्र पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली.

कुंद्राला तातडीने दिलासा नाहीच
राज कुंद्राने अटकेला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले.
त्यावरील सुनावणीवेळी न्या. अजय गडकरी (Justice Ajay Gadkari)
यांच्या एकलपीठाने सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही असे स्पष्ट केले.
त्याचवेळी 29 जुलैपर्यंत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले.

Web Title :- Raj Kundra Porn Film Case | raj kundra now kundra porn raj will also open ed apple hot shots give more 1 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्याच्या चारही धरणात पुणेकरांना वर्षभर पुरेल एवढं पाणी जमा

Accident News | काळाचा घाला ! तीन आठवड्यातच मोडला संसार; नवोदित अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

Pune News | पुण्यात PMPML बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; चार महिन्यांनी पोलिसांकडून घटनेची ‘उकल’