कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही ; ED चौकशीनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या नोटिशीवर काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे चौकशीसाठी जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय देखील होते. राज ठाकरे यांची ईडीने काल सुमारे साडेआठ तास चौकशी केली. त्यानंतर निवासस्थानी आलेल्या राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.

अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन, असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा तोफ डागली. यावेळी माध्यमांशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला. मात्र कार्यकर्त्यांना त्यांनी संदेश देताना मी तुमच्याशी उद्या बोलतो असे म्हणाले. राज ठाकरे साधारण नऊ वाजता त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले. त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि केवळ दोन शब्दांत आपली प्रतिक्रिया देऊन ते आतमध्ये निघून गेले.

दरम्यान, राज ठाकरे यांना पुढील चौकशीसाठी आज बोलावणार नसून गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे भाजप सरकारविरुद्ध आणखी आक्रमक होतील, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर तब्बल साडेआठ तास चाललेल्या चौकशीत राज ठाकरे यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like