
Raj Thackeray | “छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना नको तो मनस्ताप झेलावा लागला”; राज ठाकरेंचे बाबासाहेबांना अभिवादन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक माध्यमांवर एक पोस्ट टाकली आहे. आपल्या या पोस्टमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या कार्याची आठवण सर्वाना करून दिली. राज ठाकरे लिहितात, ‘आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj). बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली.’
छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार? असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बाबासाहेब पुरंदरेंना अभिवादन केले.
आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
विनम्र अभिवादन 🙏 pic.twitter.com/8rHxu8SnmK
— Raj Thackeray (@RajThackeray) November 15, 2022
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Cheif Sharad Pawar) यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर टीका केली होती.
बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही.
महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली.
त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला.
मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला.
माझ्यामते शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे इतका अन्याय इतर कोणी केला नाही.
शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला.’
राज ठाकरेंनी केलेली पोस्ट या प्रकारच्या टीकेला नाव न घेता दिलेले उत्तर समजले जात आहे.
Web Title :- Raj Thackeray | mns chief raj thackeray social media post for babasaheb purandare death anniversary
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू