‘मीच मुख्यमंत्री’ गर्जनेची राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून खिल्ली

ADV
पोलीसनामा ऑनलाईन 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जसे राजकीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत तसे एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून भाजप सरकारला टोला लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मीच होणार पुन्हा मुख्यमंत्री ‘असा दावा केला होता . त्यावरून राज ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ अशा मथळ्याचे व्यंगचित्र साकारले आहे . राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ec843be-cb8e-11e8-bd4c-3b4b8819dfa0′]
काय आहे व्यंगचित्रात ?
   ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ अशा मथळ्याचे हे  व्यंगचित्र आहे. आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 1 लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. या नावेवर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असे लिहिले आहे. याचाच अर्थ, राज्याची आर्थिक स्थिही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचे राज यांनी सूचवले आहे. तर बाजूलाच नावेला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभारले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, 201 तालुक्यात दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
[amazon_link asins=’B07D5ZD12G,B01N54ZM9W,B077N7DDL1,B076H51BL9,B072X2BGM5,B0756W2GWM,B00IZ95T7C,B072HVTL5G,B07B7PTPB2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2dcf8839-cb8e-11e8-a81f-c57e21610847′]
काय म्हणाले होते मुख्यमंत्री 
‘वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये. मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. .विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५५वा स्थापना दिन आणि व्हीआयए-सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी असा दावा केला होता .