EVM विरोधातील आंदोलन म्हणजे ‘पळपुटे’पणा, प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम विरोधात मोर्चे बांधणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळपुटेपणा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ईव्हीएम बाबत आक्षेपाबाबत सुप्रिम कोर्ट आणि निवडणूक आयोगात लढा दिला पाहिजे. तसे न करता केवळ आंदोलन करणे हे पळपुटेपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. सध्या शिवसेना भाजपा मध्ये सुरु असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेकडून बाण सुटला आहे. आता भाजपाबरोबरच्या बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस सोबत आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, लोसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित ही भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिल्याशिवाय पुढील बोलणी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादीमधून होत असलेल्या पक्षांतरावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे तिहार ऐवजी भाजपा जेल या नेत्यांनी स्विकारला आहे. पक्ष फोडणे ही हिटलरशाहीची लक्षणे आहेत. काँग्रेसने देखील या आधी तेच केले. आता भाजपा करत असल्याची टीका त्यांनी भाजपा आणि काँग्रेसवर केली.

आरोग्यविषयक वृत्त