राजस्थानात ‘घुंघट’ हटाव मोहिमेनं घेतलाय ‘स्पीड’

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील काही भागात अजूनही घुंघट म्हणजेच डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आहे. हळूहळू या प्रथेबाबत राजस्थानात आवाज उठवण्यात येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात घुंघट आणि बुरखा प्रथेचे निर्मुलन करण्यात यावे, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभुमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

या महिन्यात राजस्थानात पंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी मतदान करायला येणाऱ्या महिलांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा दूर करावी यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ‘घुंघट हटाव’ मोहिमेअंतर्गत महिलांमध्ये ही जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी राजस्थानातील गावागावात विशेष मोहीम हाती घेतली जात आहेत.

याबाबत बोलताना बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचे तळागाळातील कार्यकर्ते, साथीन, महिला बचतगटांतील सदस्य आणि स्थानिक महिला दर शुक्रवारी विविध विषयांवर बैठक घेत असतात. अशा बैठकांमध्ये दर महिन्याच्या एका शुक्रवारी ‘घुंघट’च्या मुद्द्यावर चर्चा केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘चौपाल रात्री’मध्येही ‘घुंघट हटाव’चा संदेश दिला जातो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या विशेष मोहिमेमध्ये तळागाळातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like