केवळ 5 हजारामध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी ; जीपचालकाला बेड्या

जैसलमेर : वृत्तसंस्था – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका जीपचालकाला राजस्थानातील जैसलमेर पोलिसांनी अटक केली आहे. व्हॉटसअप कॉलिंग करून तो आयएसआयला सांकेतिक भाषेत माहिती द्यायचा. एका माहितीसाठी त्याला पाच हजार रुपये मिळत होते. नवाब खान (३६) असे जीपचालकाचे नाव आहे.

नवाब खान जयपूरहून आलेल्या पर्यटकांना परिसरात फिरवायचे काम करतो. तो मागील वर्षी पाकिस्तानात गेला होता. तिथे गेल्यावर तो आयएसआयच्या संपर्कात आला होता. तिथे त्याचा एक नातेवाईक राहतो. तोही आयएसआयचा एजंट आहे. तिथे त्याला आयएसआयने प्रशिक्षणही दिले होते आणि तो भारतात परतल्यानंतर भारतीय सैन्याच्या सीमा भागातील हालचालींवर नजर ठेवून होता. तो व्हाट्स अप कॉलद्वारे आयएसआयला माहिती द्यायचा. तो हेरगीरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे खात्रीलायक पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी सुरु असून आणखी खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ह्याही बातम्या वाचा –

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मसूदला दिली होती क्लिन चीट : काॅंग्रेस 

#Loksabha : गिरीश बापट यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा 

युतीच्या ‘त्या’ नव्या धोरणामुळे काही जणांच्या उमेदवारीला कात्री ? 

#Loksabha : 10वी, 12वीच्या शिक्षकांना निवडणुक आयोगाचा दिलासा 

जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले