RJ : उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षातून हटविले, पायलट म्हणाले – ‘मला भाजपची खुली ऑफर’

लखनऊ : वृत्त संस्था – राजस्थान राज्यामध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाराजी नाट्याचा मध्यान्ह झाला आणि दुसरा अंक लगेचच सुरु झाला आहे. राजस्थान काँग्रेसचे सचिन पायलट यांना पक्षाने उप मुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले आहे. यावर लगेच पायलट यांनीही काँग्रेस पक्षाला उत्तर दिले आहे. त्यांना थेट भाजपामध्ये येण्याची ऑफर मिळाली आहे, असेही पायलट यांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेश राज्यमधील प्रयागराजच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट यांना भाजपामध्ये प्रवेशाची ऑफर दिली आहे. रीटा यांनी ट्विटरद्वारे ट्विट करून ही ऑफर दिलीय. ”आणखी एका काँग्रेस नेत्याचा अपमान झालाय. सचिन यांनी देशहित लक्षात घेऊन भाजपामध्ये प्रवेश करायला हवा. राहुल गांधी यांच्या वाईट वागणुकीचे आणखी एक उदाहरण” असेही त्यांनी ट्विट केले आहे. याअगोदर सचिन पायलट यांनी ट्विटरवरील आपली काँग्रेसबाबतची माहिती बदलली. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच ज्योतिरादित्या शिंदे यांनीसुद्धा काँग्रेसमध्ये योग्य स्थान नाही, अशी टीका करत पायलट यांचे समर्थन केले होते. पायलट यांनी काँग्रेसचा उल्लेख आणि फोटो काढल्यावरून जितिन यांनीही ट्विट केले आहे. सचिन पक्षातील सहकारीच नाहीत तर माझे मित्र आहेत. पक्षासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे निष्ठेने काम केले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आजूनही परिस्थिती सुधारू शकते, अशी आशा आहे. मात्र, स्थिती आता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, असेहि ते म्हणाले.

पायलट आपली बाजू मांडणार असून त्यातून पुढील दिशाही सांगण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे.

याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदही काढून घेतली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटविले आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती केलीली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिलीय.