११ वी, १२ वी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर देखील रजत राठी सीए फॉउंडेशनच्या परीक्षेत देशात प्रथम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता ११ वी आणि १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून पुर्ण केल्यानंतर देखील सनदी लेखापाल अर्थात सीए होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रजत राठीने रेकॉर्ड ब्रेक करत सीए फॉउंडेशनच्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेतून १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन सीएच्या परीक्षेत देशातून पहिला येण्याचा इतिहासच रजतने रचला आहे.

Rajat-Rathi

रजत हा पुण्यातील सहकारनगर परिसरात रहावयास असून त्याचे वडिल मेडिकलच्या दुकानात कामाला आहेत तर आई गृहिणी आहे. इयत्ता १२ वी पर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेणारा रजतने उच्च शिक्षणासाठी वाणिज्य शाखेची निवड केली. त्यानंतर त्याने सीए होण्यासाठी फाउंडेशनची परिक्षा दिली. त्याला ४०० पैकी ३५० गुण पडले. तो देशातून पहिला आला. रजतने अभ्यासाचा ताण कधीही घेतला नाही. या परिक्षेत दुसरा क्रमांक आंध्रप्रदेशच्या विद्यार्थांचा आला आहे.

रजत देशातून पहिला आल्यानंतर त्याचा दत्तवाडी पोलिसांकडून सत्कार करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी रजतचा सत्कार करून त्याचा उत्साह वाढवला. परिसरातून मित्र परिवारांनी रजतचे अभिनंदन केले आहे. जागोजागी अभिनंदनाचे फलक देखील लावण्यात आले आहेत.पुण्यातील राठी मेडिकल चे सुनील राठी यांचा तो पुतण्या आहे. रजत चे वडील सचिन राठी यांनी या यशाचे सर्व श्रेय रजत च्या आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीला दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –