राजेश बनसोडे पुण्याच्या ‘अ‍ॅन्टी करप्शन’चे नवे SP तर अरविंद चावरिया यांची औरंगाबाद ACBच्या अधीक्षकपदी नियुक्‍ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (सोमवारी) 37 आपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांसह राज्यातील इतर 51 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही पोलिस अधिकार्‍यांना पदोन्‍नती देण्यात आली आहे. पुणे आणि औरंगाबाद येथील अ‍ॅन्टी करप्शन विभागांच्या पोलिस अधीक्षकांची बदली इतर ठिकाणी करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्‍तालयात मुख्यालयात उपायुक्‍त असलेल्या राजेश बनसोडे यांची पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागात पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे तर सध्या पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागात एसपी म्हणून कार्यरत असलेल्या संदीप दिवान यांची पुण्याच्या सीआयडी मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. राजेश बनसोडे यांनी यापुर्वी पुणे पोलिस आयुक्‍तालयाच्या गुन्हे शाखेत कर्तव्य बजाविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक सराईतांना गजाआड करण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख कमी-कमी होत गेला. त्यानंतर त्यांची पुण्याच्या बाहेर बदली झाली होती. सध्या ते नवी मुंबईत कार्यरत होते. आता त्यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पुण्यात राज्य राखीव पोलिस बलामध्ये समादेशक म्हणून सध्या कार्यरत असणार्‍या अरविंद चावरिया यांची औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे सध्याचे अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक श्रीकांत एम. परोपकारी यांची बृहन्मुंबईत पोलिस उपायुक्‍त म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. उपायुक्‍त अरविंद चावरिया यांनी देखील यापुर्वी पुणे पोलिस आयुक्‍तालयाच्या मुख्यालयाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

सध्या पुण्याचे अ‍ॅन्टी करप्शनचे एसपी संदीप दिवान यांच्या गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक मोठया कारवाया करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 1 कोटी 70 लाख रूपयाचा लाचेची सापळा अगदी यशस्वी झाला. त्यामध्ये मोठे मासे गळाला देखील लागले. औरंगाबादचे एसपी श्रीकांत परोपकारी यांच्या कार्यकाळात देखील अनेक अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाया झाल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे