Rajesh Tope on Mask | ‘…तर राज्यात पुन्हा मास्कसक्ती करणार’; आरोग्यमंत्र्यांचं इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Tope on Mask | कोरोनाचं (Corona) प्रमाण कमी होत असल्याचं दिसल्यावर राज्य सरकारने मास्कसक्तीचा नियम शिथिल केला होता. आता मास्क परिधान करणं हे ऐच्छिक असेल, अशी घोषणा राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) करण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on Mask) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

कोरोना रूग्णांची संख्या (Corona patient) राज्यात इतक्या प्रमाणात वाढत नाही की चिंता करण्यासारखं आहे. मात्र रूग्णसंख्या वाढली असेल तर राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करावी लागणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जामखेड (Jamkhed) येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. (Rajesh Tope on Mask)

महाराष्ट्रामध्ये 63000 हजार सक्रीय रूग्ण पाहिले आहेत त्यामुळे आता 900 रूग्ण असणं म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढली तर मास्कसक्ती करावी लागेल, असं टोपे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना टोपे यांनी उन्हात न जाण्याचा सल्ला सर्वांना दिला आहे.

 

दरम्यान, राज्यात उष्मा (Heat) वाढला आहे त्यामुळे नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं,
बाहेर पडताना उन्हापासून आपलं संरक्षण होईल याची काळजी घ्यावी, असं टोपे म्हणाले.

 

Web Title :- Rajesh Tope on Mask | mask will have to be enforced again in the maharashtra say rajesh tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा