गॅस दरवाढीवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने गॅस दरवाढीच्या घेतलेल्या निर्णयावर काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हंटले आहे की, मोदी सरकारने पहिल्याच दिवशी देशातील जनतेला झटका दिला आहे. सरकारने विना सबसिडी असणाऱ्या गॅसच्या सिलेंडरची किमत २५ रुपयांनी वाढविली आहे तर सबसिडी असणाऱ्या सिलेंडरची किंमत 1.23 पैशांनी वाढविली आहे. चार महिन्यांनी गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. मोदी सरकारने घेतलेला गॅस दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा असे सुरजेवाला यांनी आयोजित पत्रकार परिषद सांगितले.

अमेरिकेने जीएसपीची दर्जा मागे घेतल्याबाबत रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, यामुळे भारताचा निर्यातीवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 24 नोव्हेंबर 1975 रोजी भारताने हा जीएसपीचा दर्जा प्राप्त केला होता. 44 वर्षांनंतर तो दर्जा मागे घेतला गेला आहे. यामुळे भारतातील 16 टक्के निर्यातीवर परिणाम होईल असंही सुरजेवाला यांनी म्हंटल आहे. भारत अमेरिकेत मौल्यवान दगड, हीरे आणि दागिने निर्यात करतो, ज्याची वार्षिक किंमत 11 बिलियन डॉलर्स आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदारही आहे असं सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.