LOC वर ‘भारत माता की जय…जो बोले सो निहाल’ च्या घोषणा, तुमच्यातही ‘जोश’ भरेल ‘हा’ व्हिडीओ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषे (एलओसी) जवळील एका महत्त्वाच्या फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. त्यांनी आपल्या दौऱ्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये जवानांचा जोश हाय दिसत आहे.

राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर लिहिले जो बोले सो निहाल…।

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये जवान कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड पोस्टवर ‘भारत माता की जय’ आणि जो बोले सो निहाल अशी जयघोष करताना दिसत आहेत. त्यासोबतच सिंह यांनी सैनिकांशी झालेल्या संभाषणाचे छायाचित्र पोस्ट केले आणि ट्विट केले की त्यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळील एका फॉरवर्ड पोस्टला भेट दिली व तेथे तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला.

संरक्षणमंत्री यांच्यासह मुख्य संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे नॉर्थ हिल चौकी येथे पोहोचले, तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सीमेवरील परिस्थितीविषयी माहिती दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, सर्व परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. याआधी त्यांनी पहाटे अमरनाथ गुहेच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती.