Rajshri Deshpande | ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्रीने सांगितला शाहरुखबद्दलचा ‘तो’ किस्सा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Rajshri Deshpande | बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘पठाण’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खानने या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केल्यामुळे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. किंग खान हा सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे. नुकताच एका फिल्म कम्पॅनियन या फिल्म पोर्टलने जानेवारी 2023 मधील उत्तम परफॉर्मरची यादी जाहिर केली आहे. या यादीत शाहरुख खानचं नाव आहे. शिवाय या यादीमध्ये ट्रायल बाय फायर या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) हिचं नाव देखील आहे. किंग खानसोबत एकाच लिस्टमध्ये नाव आल्यामुळे राजश्री प्रचंड आनंदी आहे.

 

अभिनेत्रीने स्वतःचा आनंद तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. राजश्री देशपांडे ट्विट करत म्हणाली, ‘शाहरुख खान याने कोरोना काळात मला आणि माझ्यासोबत मराठवाडा, केरळ आणि छत्तीसगढ या राज्यांना मदत केली. त्याच्या मीर फाउंडेशनच्या मदतीने आम्ही मराठवाडा, केरळ आणि छत्तीसगढ यांसारख्या राज्यांना वैद्यकीय सुविधा पुरवू शकलो. फिल्म कम्पॅनियन ने आज आम्हा दोघांच्या कामाला जानेवारी महिन्यातील बेस्ट परफॉर्मरस म्हणून घोषित केलं आहे.’ कोरोना काळात आम्ही भेटू शकलो नाही. ‘मला ठाऊक नाही, किंग खानसोबत माझी भेट कधी होईल. शाहरुख खानसोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.’ असं म्हणत राजश्रीने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. सोबतच शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. सध्या राजश्रीची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेटफ्लिक्सवर नुकतीच ‘ट्रायल बाय फायर’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.
दक्षिण दिल्लीमधील 1997 मध्ये ‘उपहार’ चित्रपटगृहाला लागलेल्या भीषण आगीवर ही वेबसीरिज बेतलेली आहे.
यात अभय देओल आणि मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) हे मुख्य भूमिकेत आहेत.
सिनेमात राजश्री नीलम कृष्णमूर्ती यांच्या भूमिकेत दिसली. राजश्रीने याआधीदेखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिज मध्ये तिने काम केले होते.
‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने शाहरुख खानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता तिची हि इच्छा पूर्ण होते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Web Title :- Rajshri Deshpande | marathi actress revealed how shahrukh khan helped marathwada region in mahahrashtra during lokcdown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास