…म्हणून राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना विरोधात निवडणूक लढवण्याचे दिले आव्हान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप शिवसेनेचा पराभव समोर ठेवून बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी असेही म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना स्वतःचा असा मतदार संघ नाही. ते जर दुसऱ्या मतदार संघात जाऊन निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढऊ असे संकेत राजू शेट्टी यांनी दिले. येणाऱ्या काळात राजू शेट्टी विरुद्ध चंद्रकांत पाटील असा संघर्ष पाहायला मिळू शकेल असेही ते म्हणाले.

भाजप-सेनेला हरवण्यासाठी वंचितने आघाडीने महाआघाडीला साथ द्यावी
बीड जिल्ह्याच्या आपेगाव येथे शेतकरी मेळाव्यासाठी आलेले असताना शेट्टी यांनी वृत्तसमूहांना दिलेल्या माहितीत पाटील यांना आव्हान दिले. आपेगाव मध्ये बोलताना शेट्टी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी असे संकेत शेट्टी यांनी दिले. महाआघाडीला आणखी मजबूत करण्यासाठी वंचित आघाडीने साथ द्यावी असेही शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी, चंद्रकांत पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवणार
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याआधी २ वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. येणारी विधानसभा निवडणूक लढवणे आपल्या डोक्यात नाही असे सांगताना जर चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मात्र आपण निवडणूक नक्की लढवू असे संकेत दिले आहेत. तसेच शेट्टी म्हणाले की, येणाऱ्या काळात चंद्रकांत पाटील विरुद्ध राजू शेट्टी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. असेही त्यांनी बीड येथे वक्तव्य केले.