हार्दिकचे बरे वाईट झाल्यास मोदी-शाहंना पकोडे  विकण्यास भाग पाडू  : राजू शेट्टी

अहमदाबाद : वृत्तसंस्था

उपोषणामुळे हार्दिक पटेल यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास मोदी-शहा यांना गुजरातमध्ये जाऊन चहा-पकोडे विकण्यास भाग पाडू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पाटिदार अनामत आंदोलन समितीचे प्रमुख हार्दिक पटेल गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. राजू शेट्टी यांच्यासह अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन हार्दिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bcafc61-b332-11e8-960d-95c1d626a010′]

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हार्दिक पटेल १४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत १०० दिवस उपोषण करून स्वत:चे मुत्र प्राशन केले. मात्र, या आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष करून ते मोडीत काढले. १४ दिवसात कोण्याही भाजप नेत्याने हार्दिकची भेट घेतली नसून दिल्लीप्रमाणेच हेही आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा डाव आहे. या भेटीदरम्यान उपोषण सोडण्याची विनंती राजू शेट्टी आणि व्ही. एम. सिंग यांनी हार्दिक पटेल यांना केली. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे देशभरात लढा उभारु मात्र पटेल यांनी उपोषण सोडावे असे आवाहन त्यांनी केले.

जाहीरात

२५ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेल यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हार्दिकचे उपोषण ही काँग्रेसची राजकीय खेळी असल्याचा आरोप भाजप आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे.

जाहीरात

दरम्यान, प्रकृती खालावली असली तरी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याची भूमिका पाटिदार अनामत आंदोलन समितीचे प्रमुख हार्दिक पटेल यांनी घेतली आहे. मी शेतकऱ्यांच्या, गरीबांच्या मागण्यांसाठी शेवटपर्यंत लढणार असून हार माणणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हार्दिक पटेल गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे.

उद्या पुण्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने महा मूकमोर्चा