याघटनेवर राखी सावंत म्हणाली ‘मी मान्य करते की, दीपक कलाल चुकीचे वागला. परंतु, अशा प्रकारे त्याला मारहाण नाही करायला पाहिजे. दीपकचे बोलणे चुकीचे वाटले असेल तर याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन करायला हवी.’ तसेच हार्दिक पांड्यावर निशाना साधत राखी म्हणाली, ‘हार्दिक पांड्याच्या वक्तव्यानंतर आता मीटू वाले कुठे गेले. देशात लहान-लहान मुलींवर रेप होतो, त्यावेळी हे लोक कुठे जातात.’
दीपक कलालला झालेल्या मारहाणीमुळे सध्या राखी सावंतची यू-ट्यूबवर सध्या चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी पत्रकार परिषद घेऊन लग्नाची घोषणा केली होती. नंतर राखीने या लग्नासाठी नकार दिला होता.
दीपक कलालने दिल्ली के ‘कनॉट प्लेस’मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नाराज लोकांनी दीपक कलाल भर रस्त्यावर मारहाण केली होती. या प्रकारानंतर काही लोकांनी याला एक पब्लिसिटी स्टंटदेखील म्हटले आहे.