Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; राखी सावंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव गुलदस्त्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने पती आदिल खान दुर्रानी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अशा सगळ्या गोष्टी घडत असताना राखीने आता करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती अभिनयाची कार्यशाळा लवकरच सुरू करणार आहे. राखीच्या (Rakhi Sawant) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे राखीच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 

राखी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. ती आदिल खान दुर्रानी सोबत झालेल्या प्रकरणामुळे खूपच चर्चेत आली होती. आता राखीच्या भावाने म्हणजेच राकेशने राखीच्या जीवनावर आधारित सिनेमा काढणार असल्याचे सांगितले आहे. ‘राउडी राखी’ असे सिनेमाचे नाव असणार आहे. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती राखीचा भाऊ राकेशच करणार आहे. यावेळी बोलताना राकेश म्हणाला, “राउडी राखी (Rakhi Sawant) हा सिनेमा मी करत असल्याचे वृत्त खर आहे. राखी खरच खूपच राउडी आहे. तिला त्रास देणाऱ्या लोकांना ती कायम सरळ करत असते. आपण पाहिले आहे की राखीने पती आदिलला चांगलाच धडा शिकवला आहे”.

 

लवकरच ‘राउडी राखी’ या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे. या सिनेमात राखी सावंत मुख्य भूमिकेत असणार आहे.
त्याचबरोबर अनेक दिग्गज कलाकारही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
यामध्ये असरानी, मनोज जोशी, सयाजी शिंदे आणि अनु कपूर यांचा देखील विचार केला जात आहे.
तर राखीने अद्याप तरी या संदर्भात कोणती ही अधिकृत माहिती दिलेली नाही.

 

या सिनेमात राखीची भूमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
राखीने पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि विवाहबाह्य संबंधासारखे अनेक आरोप तिने केले आहेत.
आता राखी दुबईत अभिनय कार्यशाळा आणि डान्स क्लास सुरू करणार आहे. राखी सध्या एका म्युझिकल व्हिडिओवर काम करत आहे.

 

Web Title :- Rakhi Sawant | now a film on rakhi sawant titled rowdy rakhi brother saysb she is rowdy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा