चर्चेने प्रश्न सुटत असते तर तुम्हाला तीन लग्न करावी लागली नसती, रामूचा इम्रान यांना टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पुरावा नसताना पाकिस्तानला दोषी धरु नका अशी भूमिका घेतली एवढेच नाही तर पाकिस्तानवरील केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यास तयार असल्याचे देखील इम्रान खान यांनी स्पष्ट केले. त्यावरून आता सरकार, सत्या, कंपनी चित्रपटांचे दिग्दर्शक निर्माते राम गोपाल वर्मा यांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. चर्चेने प्रश्न सुटत असतील तर तुम्हाला तीनदा लग्न करण्याची गरज पडली नसती’ अशी उपहासात्मक टीका वर्मा यांनी आपल्या ट्विटरवरून केली आहे. विशेष म्हणजे या ट्विटला १५ तासांमध्ये ५ हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केले आहे. तर २२ हजारहून अधिक जणांनी लाइक केले आहे.

राम गोपाळ वर्मा यांनी केवळ एकच ट्विट केले नाही तर ट्विटची मालिकाच लावली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे ट्विट इम्रान खान यांना टॅग देखील केले आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हंटले आहे. ‘प्रिय इम्रान खान आम्हाला वेड्या भारतीयांना हेही सांगा की हजारो किल आरडीएक्स घेऊन आमच्या दिशेने धावत येणाऱ्या व्यक्तीशी चर्चा कशी करावी. आणि या माहितीसाठी आम्ही भारतीय तुम्हाला पैसेही द्यायला तयार आहोत.’

‘जर अमेरिकेला तुमच्या देशात कोण (ओसामा) लपून बसलय हे समजतं पण तुम्हाला समजत नाही. तर खरचं तुमच्या देशाला काय म्हणावं आम्हाला कळतं नाही. मी एक वेडा भारतीय विनंती करतोय की याबद्दल तुम्ही आम्हाला शिकवावे.’

चौथ्या ट्विटमधून त्यांनी थेट दहशतवादी संघटनांची नावे घेत इम्रान यांना सुनावले आहे. ‘प्रिय इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल कायदा हे तुमच्याच हातातील खेळणी आहेत हे आम्हाला ठाऊकच नाही. पण तुम्ही कधी या सर्वांवर तुमचे प्रेम नाही असं उघडपणे म्हणालेलं आठवत नाही.’

शेवटच्या ट्विटमध्ये वर्मा यांनी इम्रान यांना बॉम्ब म्हणजे क्रिकेटचे चेंडू वाटतात का असा खोचक प्रश्न विचारला आहे. ‘प्रिय इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल कायदा सारख्या संघटनांना तुम्ही चेंडूसारखे पाकिस्तानच्या सिमेरेषेपल्याड भारताच्या पव्हेलियनमध्ये पाठवता सर. तुम्हाला क्रिकेटचा चेंडू हा बॉम्बसारखा वाटतो का सर. आम्हाला सांगा सर, आम्हाला याबद्दल ज्ञान द्या.’