राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

लखनऊ : वृत्तसंस्था – श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नृत्य गोपाळ दास यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांना ऑक्सीजन लावण्यात आला आहे. नृत्य गोपाळ दास सध्या मथुरामध्ये आहेत. आग्राचे सीएमओ आणि अनेक डॉक्टर नृत्य गोपाळ दास यांच्या उपचारासाठी पोहचले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपाळ दास, त्यांचे समर्थक आणि मथुराचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. यासोबतच सीएम योगी यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी चर्चा केली आणि महंत नृत्य गोपाळ दास यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

मथुरामध्ये आहेत नृत्य गोपाळ दास
नृत्य गोपाळ दास प्रत्येक श्रीकृष्ण जन्माष्टमीला मथुरामध्ये येतात. मथुरा यात्रेच्या दरम्यान आज त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असता ती पॉझिटिव्ही आली.

मागील काही दिवसांपूर्वी अयोध्यामध्ये रामललाचे दोन पुजारी कोरोना संक्रमित आढळले होते. याशिवाय अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोना संकट पहाता राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.