Ram Kadam | शिवसेना-शिंदे गटातील दसरा मेळाव्याच्या आगीत भाजपाचे तेल, दसरा मेळावा, काय सत्य… महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?

मुंबई : Ram Kadam | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) दसरा मेळाव्यावरून (Dasra Melava) मोठी चढाओढ सुरू आहे. दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी विविध प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसने (Congress) शिवसेनेकडे एक प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावानुसार शिवसैनिक (Shiv Sainik) जर राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील, असे वृत्त सध्या चर्चेत आहे. यावरून आता भाजपाने (BJP) शिवसेनेवर टीका केली आहे. (Ram Kadam)

मुंबईतील भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी या संदर्भात ट्विट केले आहे की, महत्वपूर्ण… दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान (Shivaji Park Ground) भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली राष्ट्रवादी (NCP) तथा काँग्रेसकडे मदत.. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजी पार्क मैदान… काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटाने आपआपल्या दसरा मेळाव्याचे टीझर रिलीज केले आहेत.
या टीझरद्वारे दोघांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेने टीझरसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यात लिहिले आहे की, एक नेता, एक झेंडा,
एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, शिवाजी पार्क दादर येथे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिवसेनेनचा टिझर शेअर करत शिवसैनिकांना वाजत गाजत,
गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!, असे आवाहन केले आहे.

दरम्यान शिंदे गटाने आपला टीझर रिलिज केला असून यात ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ‘ अशी टॅगलाईन दिली आहे.
टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार असे म्हणत बी. के. सी मैदानात (BKC Ground) सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title :- Ram Kadam | bjp ram kadam slams shivsena uddhav thackeray over dasara melava

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा