राम विलास पासवान यांच्यावर रात्री उशिरा दिल्लीत हार्ट सर्जरी, मुलगा चिराग म्हणाला – ‘आणखी एक ऑपरेशन करावं लागू शकतं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी असलेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची रात्री उशिरा हार्ट सर्जरी केली गेली. रामविलास पासवान यांचे पुत्र आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात हार्ट सर्जरी करण्यात आली. एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करत सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून वडिलांवर रूग्णालयात उपचार सुरू होते. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रात्री उशिरा त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन करावे लागले.

चिराग पासवान म्हणाले की गरज पडल्यास त्यांच्या वडिलांचे काही आठवड्यांनंतर आणखी एक ऑपरेशन करावे लागेल. चिराग म्हणाले की, या संकटाच्या परिस्थितीत माझ्या आणि माझ्या कुटुंबासमवेत उभे राहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.

दरम्यान काही दिवसांनंतर बिहारमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. रामविलास पासवान यांची तब्येत खालावल्यामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण रामविलास पासवान हे जनशक्ती पार्टीचे प्रमुख नेते आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.