‘रामायण’ मालिकेने केला धडाकेबाज ‘विक्रम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. याकाळात सोशल मीडियावर लोकांकडून 80च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार 28 मार्चपासून सकाळी 9 आणि रात्री 9 असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले आहे.

रामायण मालिकेच्या ‘टीआरपी’बाबत बोलायचे झाले तर सध्या कोणतीही इतर मालिका त्याला टक्कर देऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर 2015 पासून आतापर्यंत ठरलेल्या आतापर्यंत प्रसारित झालेल्या जनरल एंटरटेनमेंट कॅटगरीच्या मालिकांतही रामायण मालिका सर्वोत्तम ठरत आहे. रामायण मालिकेच्या टीआरपी रेटिंगबद्दल डीडी नॅशनल चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी माहिती दिली. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की दूरदर्शनवर प्रसारित होणारी रामायण मालिका 2015 पासून आतापर्यंतच्या मालिकांमधील सर्वाधिक टीआरपी मिळवणारी हिंदी मालिका ठरली आहे. 2015 मध्ये जेव्हापासून रेटिंग सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून दूरदर्शनसाठी रामायण मालिका एक विक्रम ठरला आहे. कोरोनाच्या लॉकडाउन काळात दूरदर्शन वाहिनी मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले. रामायण या जुन्या मालिकेसोबतच महाभारत, शक्तिमान, ब्योमकेश बक्षी, सर्कस, फौजी, श्रीमान श्रीमती या मालिकांचेही पुन:प्रक्षेपण केले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like