Ramdas Athawale | ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; मोदींच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्याची मागणी ! राज्याच्या राजकारणात येणार मोठा ट्विस्ट?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ramdas Athawale | राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Central Cabinet Meeting) सामाजिक केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. दिल्लीत (Dehli) पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलताना आठवलेंनी (Ramdas Athawale) याबाबत माहिती दिली.

 

राज्यात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) नेत्यांचा गैरसमज आहे की, भाजपचं दिल्लीमध्ये सरकार असल्याने सरकार त्यांच्यावर ईडीला (ED) कारवाई करायला सांगत असल्याची त्यांची भावना आहे. मात्र आमचा ईडीसोबत काहीही संबंध नाही. ईडी ज्यांच्याविरोधात कारवाई करत आहे त्यांना ती चुकीची वाटत असेल त्यांनी कोर्टात (Court) जावं आणि तसा पुरावाही द्यायला हवा, असं रामदास आठवले म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) गंभीर आरोप करत असतात.
राफेलच्या करारावरून (Rafale Deal) त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप केले होते.
मग आम्ही कधी त्यांची चौकशी केली का ?, त्यामुळे माझं महाविकास आघाडी सरकारला विचारणं आहे की, तुम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर अन्याय का करत आहात ?,
जर महाविकास आघाडी सरकार अशाच पद्धतीने वागत असेल तर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांना पत्र लिहित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावीच,
अशी मागणी करणार असल्याचं आठवलेंनी (Ramdas Athawale) सांगितलं.

 

दरम्यान, रामदास आठवलेंनी केलेल्या मागणीवर महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Ramdas Athawale | pm narendra modi cabinet one minister big statement about president rule in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा