Ramdas Athawale | नागपूरातून रामदास आठवलेंची कवितेतून PM मोदींवर रोजगार दिल्याबद्दल स्तुतीसुमने

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आज नागपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (दि.22) रोजी केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा (Recruitment Fair) शुभारंभ झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले (Ramdas Athawale) बोलत होते.

 

आज देशामध्ये इतिहास घडत आहे नवा (2)
कारण सरकारी नोकरीवर चढत आहे आमचा युवा
देशात आहे आज नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) हवा (2)
एनडीए (NDA) आणि महायुती सरकार हेच आहेत त्यासाठी चांगला दवा.

 

आपल्या खास शैलीत आठवलेंनी वरील कविता म्हणत आज पार पडलेल्या भरती मेळाव्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान कार्यालयाने मला आज नागपूर शहरात पाठविले आहे. त्यामुळे मी येथे आल्याचे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

तसेच नागपूर शहर हे भारतातील सर्वात महत्वाचे शहर आहे. नागपूर शहर (Nagpur City) उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा जोडणारा बिंदू आहे. नागपूर शहर आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) 14 ऑक्टोबर 1956 साली या शहरात बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती. तसेच 3 ऑक्टोबर 1957 रोजी याच शहराच्या साक्षीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (Republican Party of India (RPI) स्थापना झाली. त्यामुळे मला हे महत्वाचे शहर दिले आहे, त्याचा मला आनंद आहे असे आठवले म्हणाले.

 

आमचे सरकार रोजगार देण्याच्या बाबतीत अग्रेसर आहे. आतापर्यंत 36 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.
त्याचबरोबर खासगी नोकऱ्या देखील अनेक तरुणांना मिळाल्या आहेत.
या वर्षी आम्ही दहा लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे, असे देखील आठवले म्हणाले.

 

Web Title :- Ramdas Athawale | Praise of Ramdas Athawale from Nagpur for giving employment to PM Modi through poetry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…,  ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे सोपं नाही, कारण…, आ. रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

Narayan Rane | उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत, नारायण राणेंचे टीकास्त्र