Ramdas Kadam | ‘कोणाला गद्दार म्हणताय… खरा गद्दार आदित्य ठाकरे’, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे नेते (Shinde Group) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Pollution Control Board) 100 कोटी रुपये घेतल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. यानंतर आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे खोके खोके करत फिरत आहेत, कोण गद्दार? आदित्य ठाकरे गद्दार, कोणाला गद्दार म्हणताय, अशा शब्दात रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी टीकास्त्र सोडलं.

 

प्लास्टिक बंदीचा कायदा (Plastic Ban Act) केला, पण आदित्य ठाकरे कायदा मी केला म्हणतात. खरा गद्दार आदित्य ठाकरे आहे, त्यांनी मला संपवण्याचं काम केलं. मातोश्रीवर मिठाईचे खोके जातात, तुम्ही कुणाला खोके सांगताय. खोके, खोके, बोके कुणाला म्हणता? हळू हळू सगळं बाहेर पडेल, असा पलटवार कदम (Ramdas Kadam) यांनी केला.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधताना रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे, माझा मुलगा शरद पवारांच्या (Sharad Pawar) नादाला लागून बिघडला, असं बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) वाटत असेल. बाळासाहेबांनी जे कमावलं ते सगळं उद्धव ठाकरे यांनी गमावलं. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार होते, मात्र एका दिवसात निर्णय बदलला. एकनाथ शिंदे यांना फसवलं गेलं. उद्धव ठाकरेंचं योगदान काय? बाळासाहेबांचा मुलगा म्हणून सांगावे का लागतं? असा सवाल कदम यांनी केला.

 

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) बाडगा आहे, नेतेपद मिळाल्याने माझ्यावर टीका केली. माझ्यावर टीका करायला त्याची लायकी आहे का? भास्कर जाधव यांना 95 मध्ये मी तिकीट द्यायला लावलं. अनंत गिते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) टीका केली होती. आता तुम्ही तटकरेंचं काम करणार का? असा टोला कदम यांनी भास्कर जाधवांना लगावला.

 

Web Title :- Ramdas Kadam | ramdas kadam allegations on aaditya thackeray targets uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | विराट कोहली सलामीला खेळणार? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…

Narayan Rane | नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले – ‘अस्तित्व आहेच कुठे?… ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत’

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू