IPS अधिकारी रामनाथ पोकळे पिंपरी-चिंचवडचे नवे अप्पर पोलीस आयुक्‍त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) तब्बल 20 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही पोलिस उप महानिरीक्षक अधिकार्‍यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे तर काही वरिष्ठ पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना पोलिस उप महानिरीक्षक/ अप्पर पोलिस आयुक्‍त पदी बढती देण्यात आली आहे.

सध्या राज्य गुप्‍तवार्ता विभागात (मुंबई) ये पोलिस उपायुक्‍त असलेले रामनाथ पोकळे यांना अप्पर पोलिस आयुक्‍तपदी बढती देण्यात आली असुन त्यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे.
सध्याचे अप्पर पोलिस आयुक्‍त मकरंद रानडे यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्‍नती झाली असून त्यांची बदली आता अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रामनाथ पोकळे यांची अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे. रामनाथ पोकळे यांनी यपुर्वी पुणे ग्रामीण येथे अप्पर पोलिस अधीक्षक, पुणे शहर येथे पोलिस उपायुक्‍त, जालना येथे पोलिस अधीक्षक आणि त्यानंतर राज्य गुप्‍त वार्ता विभागात उपायुक्‍त म्हणून कर्तव्य बजाविले आहे. पोकळे यांना पदोन्‍नती देण्यात आली असुन त्यांची आता अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणुन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात बदली करण्यात आली आहे.