युवतीच्या जिद्दीसमोर रेल्वे प्रशासन झुकलं ! एका प्रवाशासाठी धावली राजधानी एक्सप्रेस, 535 KM आंतर पार करत रांचीला पोहचली रात्री 1.45 वाजता

रांची : जाणार तर राजधानी एक्सप्रेस मधूनच. जर मला बसने जायचं असतं तर रेल्वेचं तिकीट का घेतलं असतं. तिकीट राजधानी एक्सप्रेसचं आहे तर मी रेल्वेनेच जाणार. टाना भक्तांच्या आंदोलनात अडकलेल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये असलेली प्रवासी अनन्याने हट्ट केला असता रेल्वे अधिकारी परेशान झाले. काय करावं त्यांना काहीच समजत नव्हतं पण शेवटी तिच्या हट्टापुढे त्यांना झुकावं लागलं. राजधानी एक्सप्रेस संध्याकाळी 4 वाजता डालटनगंजला परत जाऊन जकार गोमो आणि बोकारो मार्गे रांचीला नेण्यात आली. रात्री 1.45 वाजता रेल्वे रांची स्टेशनवर पोहचली.

या रेल्वेत अनन्या एकटीच प्रवासी होती. 930 प्रवाशांपैकी 929 प्रवाशांना रेल्वेने डालटनगंजहून बसने पाठवलं होतं. रेल्वेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असेल की एका प्रवाशाला सोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस 535 किलोमीटरचा प्रवास केला. डालटनगंज रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आणिक कुमार तिवारी यांनी सांगितलं की, अनन्या मुगलसरायहून रांची साठी नवी दिल्ली रांची स्पेशल राजधानी एक्सप्रेसमध्ये बसली होती. अनन्या रेल्वेच्या बी-3 कोच मध्ये होती आणि ती 51 नंबर सीटवर बसली होती. ती रांचीच्या एचइसी कॉलनी मध्ये राहते, ती बीएचयू मध्ये एलएलबीचा अभ्यास करत आहे.

अधिकाऱ्यांना वाटलं आंदोलन लवकर संपेल

लातेहार जिल्ह्यातील टोरीमध्ये टाना भक्त रेल्वे ट्रकवर आंदोलन करत होते त्यामुळं ही रेल्वे डालटनगंजमध्ये थांबवण्यात आली. अधिकाऱ्यांना वाटलं आंदोलन लवकर संपेल पण ते लवकर संपलं नाही म्हणून याबाबद्दलची माहिती रेल्वे बोर्डाच्या चेअरमला देण्यात आली. त्यांनी प्रवाशांना बसने रांचीला पोहचवण्याचे आदेश दिले त्यानुसार सर्व प्रवासी बसने गेले पण अनन्या मात्र अडून बसली.

कारने पाठवणार म्हटलं तरी ऐकलं नाही

रेल्वे अधिकाऱ्यांनी अनन्याला कारने रांचीला पाठवतो असं सांगितलं पण ऐकायला तयार नव्हती. तिने हट्ट केला की ती राजधानी एक्सप्रेसनेच रांचीला जाणार.रेल्वे बोर्डाच्या चेअरमला सर्व प्रकार सांगण्यात आला. अनन्याला राजधानी एक्सप्रेसने रांचीला पाठवा असे बोर्डाने डीआरएमला निर्देश दिले.

आरपीएफ जवानांच्या सुरक्षेत पोहचली अनन्या

राजधानी रेल्वेमध्ये अनन्या एकटी प्रवासी होती. रेल्वेने अनन्याच्या सुरक्षेसाठी महिला शिपाई पाठवण्यास सांगितले होते पण रांची रेल्वे स्टेशनवर जेव्हा रेल्वे थांबली तेव्हा बी3 कोच मध्ये फक्त आरपीएफचा एक जवान बाबूलाल कुवरला अनन्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याला आले होते.

535 किलोमीटर चालली राजधानी एक्सप्रेस

रेल्वे डालटनगंजहून सरळ रांचीला जाणार होती हे अंतर 308 किलोमीटर होते. पण रेल्वे जकार गोमो आणि बोकारो मार्गे रांचीला नेण्यात आली. हे अंतर 535 किलोमीटर इतके होते. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 25 वर्षांपासून मी रेल्वेत काम करत आहे पण आजपर्यंत एका प्रवाशासाठी रेल्वे 535 किलोमीटर अंतर कधीच गेली नाही.

मी सरळ सांगितलं की रांचीला सोडावं लागेल

गोमो स्टेशनवर रेल्वे अनेक तास उभी होती आणि त्यांनंतर रेल्वेने काही खटारा बस आणून त्यातून रांचीला जाण्यास सांगितलं. सर्व प्रवासी उतरून गेले. मी सांगितलं की, प्रवाशांना रांचीपर्यंत पोहचववणं तुमची जिम्मेदारी आहे. एवढं बोलून देखील ते ऐकायला तयार नव्हते. मी आत बसून राहिले, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रवाशांनी मला उतरायला सांगायचा प्रयत्न केला पण मी कोणाचं ऐकलं नाही. मी हार मानली नाही आणि सांगितलं की मला रांचीला सोडावं लागेल. अनन्याच्या मते हा सगळा प्रकार मिस मॅनेजमेंटमुळे घडला आहे. रात्री रेल्वे प्रशासनानं सांगितलं की रेल्वे डागलगंज मार्गे जाणार नाही. तिने रेल्वेच्या सुरक्षा, सफाई यावरून देखील प्रश्न उपस्थित केले.