#Mardaani2 : ‘मर्दानी 2’ च्या चित्रीकरणाला सुरूवात, कधी होणार प्रदर्शित ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राणी मखर्जी हिचा सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मर्दानी या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून होती. यानंतर आता मर्दानी 2 च्या चित्रकरणाला सुरुवात झाली असल्याचे समजत आहे. दरम्यान राणीने ‘नो वन किल जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ अशा दमदार कथानकाच्या जोरावर चित्रपट सुपरहिट करून दाखवले आहेत.

मर्दानी 2 च्या सेटवरील राणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. मर्दानी 2 च्या सिक्वलमध्ये राणी 21 वर्षांच्या खलनायकासोबत लढताना दिसणार आहे. राणीला या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा आहेत. यावेळी या चित्रपटाचं कथानक पूर्णपणे वेगळं असणार आहे. आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत असून हा चित्रपट 2019 च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राणीची प्रमुख भूमिका असणारा मर्दानी हा चित्रपट 2014 साली आला होता. यात राणी पोलिसांच्या भूमिकेत होती. तिची भूमिका सर्वांनाच भावली होती. लहान मुलांचं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या गँगचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीनं सगळ्यांचीच प्रशंसा मिळवली. आतापर्यंत रोमँटिक भूमिकेत दिसलेल्या राणीचं हे रुपही सर्वांना आवडलं. आपल्या वेगळ्या भूमिकेचा ठसा यावेळी राणीने उमटवला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.