मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला 800 किलोचा दुर्मिळ मासा, 20 लाखांना विकला गेला

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – एका फ्लाइंग शिपसारखा दिसणारा सुमारे 800 किलोचा मासा जाळ्यात अडकला आहे, जो 20 लाख रुपयांना विकला गेला आहे. हा मासा फारच दुर्मिळ आहे, जो यापूर्वी या भागात कधीच दिसला नव्हता. पश्चिम बंगालच्या दिघा येथे हा प्रचंड मोठा मासा पकडला गेला आहे. पश्चिम बंगालच्या दिघा येथे एका ट्रॉलरने चिलशंकर फिश नावाच्या 780 किलो मासा पकडला. मच्छीमार हा मासा पकडल्यामुळे खूप खुश झाले आहेत.

सोमवारी ज्या ट्रॉलरकडून हा काळ्या रंगाचा मासा पकडला गेला, त्या ट्रॉलरचा मालक ओडिशाचा आहे. जेव्हा हा मासा दिघामध्ये पकडला गेला, तेव्हा तेथील स्थानिक पर्यटकांची गर्दी झाली होती. वजन जास्त असल्याने माशाला हालचाल करता आली नाही.

हा मासा दोरीने बांधला होता आणि व्हॅनमध्ये ठेवला होता जो मोहना फिशर असोसिएशनकडून घेण्यात आला होता. जेव्हा बाजारात त्याची बोली लावण्यात आली तेव्हा 2100 रुपये प्रतिकिलो किंमत मिळाली. अशा प्रकारे मच्छीमारला माशाची संपूर्ण किंमत सुमारे 20 लाख रुपये मिळाली. लॉकडाऊन दरम्यान हे मच्छीमारांसाठी लॉटरी लागण्यासारखे आहे.

स्थानिक मच्छीमार अजिरुल यांनी सांगितले की, हा सुमारे 800 किलोग्रॅम वजनाचा चिल्लशंकर मासा आहे. त्याचा बाजारभाव दर किलो 2100 रुपये आहे. एवढा मोठा आणि दुर्मिळ मासा आपण यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. या फिशचे ऑइल आणि हाडांपासून औषधे बनविली जातात. उरलेला भाग पावसाळ्यात फूड डिश म्हणून वापरली जातात.