Rashmi Thackeray | मनसे नेत्याची रश्मी ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘त्यांनी इतका हस्तक्षेप केला की…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील एका सभेत बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारभारात रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले असा गंभीर आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. ते काल दि.७ मुंबईत आयोजीत मनसेच्या सभेत बोलत होते.

 

यावेळी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, ‘आपण नेहमी म्हणतो राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट. एक स्त्रीहट्ट उभा राहिला आणि एक महाविकास आघाडी तयार झाली. ही आघाडी तयार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील नारद शरद पवार, झाकणझुले संजय राऊत यांचा समावेश होता. सत्तेशिवाय यांना करमत नाही. त्यामुळे या जोडगोळीने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पटवण्यासाठी एक काम केलं आणि उद्धव ठाकरेंच्या घरी सैरंध्रीने केस मोकळे सोडले. ’अशा शब्दात त्यांनी रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत.

 

तसेच याबाबत पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, ‘सैरंध्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात रस नव्हता, तर मुलाला मंत्री करायचं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू झाला. मुळात ‘औकात’ नसलेल्या माणसाला गादीवर बसवण्यात आलं. त्यांचं आजारपणही खरं होतं की खोटं माहिती नाही, पण कारभार त्यांच्या पत्नीला करायचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आजारी पाडण्यात आलं.’ असा घणाघात यावेळी बोलताना प्रकाश महाजन यांनी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) केला.

त्याचप्रमाणे बायकोने एवढा हस्तक्षेप केला की उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदचं गेले असा आरोप त्यांनी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) केला आहे.
प्रकाश महाजन म्हणाले, ‘महाभारतात धर्मराजाने आपलं सर्व राज्य, भाऊ, बायको पणाला लावले आणि युद्धात हरले.
इथं मात्र, कारभार सुरू झाला आणि बायकोने इतका हस्तक्षेप केला की, नवऱ्याचं राज्य पणाला लागलं,
मुख्यमंत्रीपद गेलं. अर्थात ते आलंच असं होतं की, जाण्याचं दुःख वाटण्याचं कारण नाही.
असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

 

Web Title :- Rashmi Thackeray | MNS leader criticizes Rashmi Thackeray; Said – ‘They interfered so much that…’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक