3 कोटी रद्द Ration card मध्ये तुमच्या पत्नी-मुलाचे तर नाव नाही ना ! पुन्हा नोंदण्यासाठी जाणून घ्या ही पद्धत

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून 3 कोटी रेशन कार्ड रद्द केल्याच्या वृत्तावर देशभरात चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टात दाखल एका जनहित याचिकेत म्हटले आहे की, देशाच्या विविध राज्यांमध्ये 3 कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आली. यापाठीमागे आधार लिंक नसल्याचे कारण सांगण्यात आले आहे. यावर सुप्रीम कोर्टाने सरकारकडून उत्तर मागवले आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला याच्या संबंधीत आवश्यक माहिती देणार आहोत. जर तुमचे नावसुद्धा रेशन कार्ड लिस्टमधून कमी केले असेल तर आता पुन्हा आपले नाव रेशन कार्ड लिस्टमध्ये नोंदवू शकता. याबाबत माहिती घेवूयात…

ताबडतोब उचला ही पावले
कुणाचे नाव जर रेशन कार्डमधून कापले गेले असेल तर आधार कार्ड आणि आपले नाव ज्या रेशनकार्डमध्ये नोंदवायचे आहे, त्या कार्डची फोटो कॉपी घेऊन आपल्या जवळच्या सीएससी केंद्र किंवा जन सुविधा केंद्रावर जा.

येथे जाऊन तुम्ही तुमचे नाव नोंदवू शकता. यानंतर तुम्हाला तिथे रिसिट दिली जाईल. ती घेऊन आपल्या तहसीलमध्ये जमा करा. काही दिवसात रेशन कार्डमध्ये तुमचे नाव जोडले जाईल.

असे नोंदवा नव्या सदस्यांचे नाव
नव्या सदस्याचे नाव दोन पद्धतीने नोंदवता येते. पहिली पद्धत, जन्मलेले बाळ आणि दुसरी पद्धत पत्नी, जी विवाहानंतर तुमच्या कुटुंबात सदस्य म्हणून आली आहे.

सर्वप्रथम तुम्ही दोघे आपले वेगवेगळे रेशन कार्ड बनवा किंवा पत्नीच्या आधार कार्डमध्ये दुरूस्ती करा.

आधार कार्डमध्ये मुलीच्या वडीलांच्या ठिकाणी पतीचे नाव नोंदवा. यानंतर आपले आणि पत्नीचे आधार कार्ड घेऊन जाऊन तहसीलमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना द्या.

अगोदरच्या रेशनकार्डमधून तुमचे नाव काढून घ्या आणि नंतर नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा. ज्या रेशन कार्डममध्ये तुमचे नाव टाकायचे आहे.

तुम्हाला तुमच्या पत्नीचे नाव सुद्धा त्याच रेशनकार्डमध्ये नोंदवायचे असेल तर तुम्हाला आपल्या पत्नीच्या आधारामध्ये दुरूस्ती करावी लागेल. त्यानंतर पत्नीचे आधार जन सुविधा केंद्रावर जाऊन जमा करावे आणि ऑनलाइन व्हेरिफिकेशननंतर पत्नीचे नाव नोंदवले जाईल.