Ration Card | खुशखबर ! मोदी सरकारने रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration Card | देशातील रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. रेशन कार्ड (Ration Card) आधारशी लिंक (Aadhaar Card Link) करण्याची अखेरची तारीख वाढवली आहे. सरकारच्या नव्या घोषणेनुसार आता 30 जून 2022 पर्यंत रेशन कार्ड आधारशी लिंक करू शकणार आहेत. (Deadline For Ration Card Linking With Aadhaar Extended Till 30 June 2022)

 

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून (Department of Food And Public Distribution) याबाबत अधिसूचना जारी करण्यात आले आहे. यानूसार रेशन कार्ड लाभार्थ्यांंनी अद्याप जर रेशन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर लगेचच करा. अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, रेशन कार्ड आधार कार्ड लिंक (Ration Card Aadhaar Card Link) करून तुम्ही ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (‘One Nation One Ration Card’) योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या माध्यमातून लाभार्थी भारतातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून धान्य मिळवू शकणार आहे. (Ration Card)

 

Ration Card ऑनलाईन लिंक करण्यासाठी –

सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करा.

येथे तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल.

यानंतर Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक करा.

आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई – मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.

ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

येथे OTP भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचा आधार Verify होईल आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक केलं जाईल.

 

Ration Card ऑफलाईन लिंक करण्यासाठी –
रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्डची प्रत, रेशन कार्डची प्रत आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनकार्ड केंद्रावर जमा करायचा आहे. याशिवाय तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन Biometric data verification रेशनकार्ड केंद्रावरही केले जाऊ शकते. याबाबतचे वृत एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

 

Web Title :- Ration Card | deadline for ration card linking with aadhaar extended till 30 june 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा