शासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध करून देणे बंधनकारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकारचे परिपत्रक अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आले आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. ग्रामीण तसेच शहरी भागातील रेशनकार्ड धारकांना रास्तभाव दुकानदार महिन्यातील ठराविक वेळेनंतर उपलब्ध करून देत नाही. या संदर्भात विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. तसेच काही आमदारांनी या विषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते.

याची दखल घेऊन अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या विषयी परिपत्रक काढले आहे. यांमुळे रेशनकार्ड धारकाला आता महिन्याचा कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात धान्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. दुकानदाराने असे न केल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवायी करण्यात येईल.

या आदेशाची सूचना संबंधित विभागांना परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री जयकुमार रावल यांनी प्रशासनाला दिले आहेत. माजी मंत्री गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्यामुळे या विभागाचा अतिरिक्त भार मंत्री जयकुमार रावल यांना देण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’
घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक