Ration Card | रेशन कार्डमध्ये ‘या’ पध्दतीने नोंदवा कुटुंबातील सदस्याचे नाव, ‘फ्री’ धान्यासह मिळतील ‘हे’ जबदस्त फायदे; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : रेशन कार्ड (Ration Card) मध्ये नाव नोंदणे अतिशय आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव नोंदवायचे असेल तर आता हे काम काही मिनिटात करू शकता. नवीन नाव नोंदवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन (how to add name in ration card online) मोड निवडू शकता. याबाबत पूर्ण प्रक्रिया जाणून घेवूयात…

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंदण्यासाठी लागणारी कागदपत्र –

1. असे नोंदवा मुलाचे नाव

घरात नवीन मुल जन्माला आले असेल तर त्याचे नाव रेशन कार्डमध्ये टाकण्यासाठी कुटुंब प्रमुखाच्या रेशन कार्डसह मुलाचा जन्म दाखला आणि मुलाच्या आई-वडील दोघांच्या आधार कार्डची आवश्यकता आहे.

2. नवी सदस्याचे नाव असे नोंदवा

नवीन सुनेचे नाव टाकण्यासाठी अगोदर तिच्या आई-वडीलांच्या घरात जे रेशन कार्ड असेल त्यामधून नाव काढावे लागेल. नाव काढल्याचा दाखला, मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकता असेल. पतीचे रेशन कार्ड (फोटोकॉपी आणि ओरिजिनल दोन्ही). याशिवाय महिलेच्या आधार कार्डची आवश्यकता आहे.

Pune Crime | खडकीत तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खुन

अशाप्रकारे नोंदवा ऑनलाइन नाव –

रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

जर तुम्ही उत्तर प्रदेशचे राहणारे असाल तर तुम्ही https://fcs&up&gov&in/FoodPortal&aspx da वर जाऊन फॉर्म डाऊनलोड करू शकता.

बिहारचे राहणारे hindiyojana&in/apply-ration-card-bihar/

आणि महाराष्ट्राचे अर्जदार mahafood&gov&in वर क्लिक करून अर्ज करू शकतात.

यानंतर Apply online for ration card या लिंक वर क्लिक करा.

रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येईल.

रेशन कार्डसाठी अर्जाचे शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अ‍ॅप्लीकेशन सबमीट करा.

फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर तुमचे रेशन कार्ड बनवले जाईल.

रेशनमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंदण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया –

1. जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जा.

2. सोबत सांगितलेले सर्व कागदपत्र घेऊन जा.

3. नवीन सदस्याचे नाव नोंदण्याचा अर्ज घ्या.

4. अर्जात सर्व माहिती भरा.

5. कागदपत्रांसह हा अर्ज विभागात जमा करा.

6. येथे काही अर्ज शुल्क भरावे लागले.

7. अर्ज जमा झाल्यानंतर अधिकारी रिसिप्ट देतील, जी सांभाळून ठेवा.

8. या रिसिप्टद्वारे ऑनलाइन अर्जाचे स्टेटस जाणून घेवू शकता.

9. अधिकारी अर्ज तपासतील, कागदपत्रांची पडताळणी करतील आणि किमान 2 आठवड्यात रेशनकार्ड घरपोच मिळेल.

हे देखील वाचा

Shashi Tharoor | शशी थरूर यांनी गायले – ’एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई…’ ऐका त्यांचा सुरेल आवाज, VIDEO

Crime News | गुंडाचा त्याच्याच मित्राने केला घरात घुसून खुन; कारण समजल्यावर पोलीसही झाले ‘अचंबित’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ration Card | ration card latest news how to add family member name in ration card online and offline know here process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update